शिवसेनेच्या लेटरहेडवरून जीवे मारण्याची धमकी आल्याची नवनीत राणांची पोलिसात तक्रार

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लोकसभेत शिवसेनेच्या विरोधात बोलल्यामुळे ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या लेटरहेडवरून ही धमकी दिली आहे. खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. या प्रकरणी नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एफआयआरची प्रत ही १३ फेब्रुवारी २०२१ ची आहे. ८ फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील माझ्या भाषणाविरोधात शिवसेनेचे लेटरहेड असलेले निनावी पत्र देऊन अपमान आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच आठ दिवसांत मला आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची आणि अॅसिड हल्ल्याची धमकी दिली गेली आहे, असं नवनीत कौर राणा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी हे पत्र पाठवले आहे. लोकशाहीसाठी असे शब्द मुळीच चांगले नाहीत. आपल्यासंबंधी अश्लील शब्दांचा वापर करून धमकी देणारे फोनही केले जात आहेत. कोणत्याही सामान्य स्त्रीविरूद्ध हा गंभीर गुन्हा आहे, असं नवनीत कौर राणा यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here