जळगांव (उपसंपादक विवेक खडसे) – सावदा-फैजपूर येथील यशवंत भोरटेके शासकीय आय. टी.आय येथून गट निदेशक सेवानिवृत्त यांची मुलगी डॉ.तोशिका भोरटके हिचे दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी केमिस्ट भवन येथे लग्न पार पडले. नवरी मुलीचे आई वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याकारणाने ते लग्नाला हजर न राहता त्यांनी घरूनच मुलीला आणि जावयाला आशीर्वाद दिला मुलगी पुण्याला डॉक्टर असून ती घरी न जाता हॉटेलमध्ये वास्तव्यास होती या माध्यमातून परिवार एकच संदेश देऊ इच्छितो कामानिमित्त घराबाहेर पडा आणि घराबाहेर जाताना मास्क लावा स्वतःची काळजी घ्या आणि बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा.






