नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनावरून ट्विट करत भारतातील राजकारण तापवले होते. आता पुन्हा एकदा तिच्या नव्या ट्विटमुळे भारतात वाद सुरू झाला आहे. रिहानाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिहान ट्विटरवर स्वत:चा टॉपलेस फोटो त शेअर केला आहे. ती एवढ्यावरच थांबलेली नाही. तिने टॉपलेस फोटोमध्ये तिच्या गळ्यात श्री गणेशाचे एक लॉकेट दिसत आहे. ट्विटरवर हा फोटो दिसल्यानंतर भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने रिहानावर हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. भाजपने या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधीना प्रश्न उपस्थित केला आहे.

गळ्यातील लॉकेटमुळे ती ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्सवर टीका केली जात आहे. फोटो शेअर करत रिहानाने लिहिलंय- when PopcaanMusic said “me nuh wan ya wear no lingerie tonight fa me girl”. ट्विटरवर तिने आपला टॉपलेस फोटो ट्विट केल्यानंतर अनेक लोकांनी रिहानावर संताप व्यक्त केला आहे. रिहानाच्या अनेक भारतीय फॅन्सनेदेखील तिच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर तिने केलेल्या प्रकारामुळे नेटकरी संतापले आहेत. रिहानाने हे फोटोशूट एका कंपनीसाठी केला होता. एका युजरने लिहिलंय- ‘रिहाना-माझ्या धर्माचा वापर एक सौंदर्याची वस्तू म्हणून करू नका, चेनमध्ये गणेशाची मूर्ती आहे, ती आमची पवित्र देवता आहे.’
या प्रकरणावरून भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रश्न उपस्थित केला आहे. राम कदम यांनी ट्विट केलं आहे, ‘हे पाहणे भयावह आहे…कशाप्रकारे रिहाना आमचा प्रेमळ देव भगवान गणेशाचे अपमान करत आहे. यावरून या गोष्टीचा पर्दाफाश होतो की, रिहानाच्या मनात भारतीय संस्कृती, परंपरांविषयी कुठलाही विचार किंवा सन्मान नाही. आता अपेक्षा आहे की, कमीत कमी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी भारताची प्रतिमा मलिन करण्यात तिची मदत करणे बंद करावे. ते तिच्यावर टीका करतील? की सत्तेची भूक भगवान गणपतीपेक्षा मोठी असेल?’ दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेने ट्विटरकडे रिहानाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.






