मुंबई (प्रतिनिधी) – लॉकडॉनध्ये चित्रपट , नाट्य क्षेत्र देखील बंद पडली होती. पण आता ती कुठे सुरु होऊ पाहतायत तर एक नवीनच वाद उद्भवला आहे. प्रसिद्ध नाट्य अभिनेते, निर्माता दिवंगत मछिंद्र कांबळी यांचे सुपुत्र प्रसाद कांबळी यांच्यात तसेच कार्यकारिणी सदस्य यांच्यात अनेक कारणावरून वाद उद्भवला आहे. सात कार्यकारिणी सदस्यांनी प्रसाद कांबळी यांच्या विरोधात बैठक घेतली. याचा राग येऊन प्रसाद कांबळी यांनी नाट्य परिषदेच्या कार्यालयाला टाळे ठोकले. या सर्व पार्श्वभूमीवर नाट्य परिषदेच्या माटुंगा येथील कार्यालयाला पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांचा गराडा या कार्यालयाला पडला आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…






