पुण्यात लस घेतल्यानंतरही अवघ्या 8 दिवसात दोघांना झाली कोरोनाची लागण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतर अनेकजण सध्या विनामास्क निर्धोकपणे फिरू लागले आहेत. मात्र लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याच्या घटना पुढे येत आहेत. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या 8 दिवसात दोघांना कोरानाची लागण झाली आहे.

याबाबत या हॉस्पिटलचे डीन डॉ. तांबे म्हणाले की, “केंद्रीय लसीकरण मोहिमेंतर्गंत ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांसहित सर्वच पॅरामेडिकल स्टाफला कोरोनाची लस दिली जात आहे. पण ही लस घेतलेल्यापैकीच दोघेजण कोराना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी केली असता हा प्रकार समोर आला आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना होम क्वारन्टाइन करण्यात आलं आहे.”

या दोघांनाही सिरमची कोविशिल्ड ही लस देण्यात आली होती. पण कोरोनाची लस देऊनही पुन्हा कोरोनाची लागण झालीच कशी, असा सवाल उपस्थित झाला. याबाबत ससूनचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी विचारले असता त्यांनी असा प्रकार होऊ शकतो, असं सांगितलं. कारण कोरोनाची लस घेतली तरी त्याद्वारे शरीरात तयार होणारी रोग प्रतिकारक शक्ती ही दुसऱ्या डोसनंतर 15 दिवसांनी आपला प्रभाव दाखवते. त्यामुळे लस टोचून घेतली म्हणून लगेच काही मास्क वापरणं, हात सॅनिटाइज करणं किंवा सोशल डिस्टंट पाळणं लोकांनी सोडून देऊ नये, असं आवाहनही डॉ. तांबे यांनी केलं आहे.

तसंच कोरोना होऊन गेला म्हणून काही तुम्ही कायमचे स्वत:ला कोरोनापासून वाचवू शकत नाहीत. कारण कोरोनाच्या अँटीबॉडीज नेमक्या किती काळ शरीरात राहतात, याबाबत कुठंलेही ठोस निष्कर्ष अजून समोर आलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here