आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज गुरुवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी’, असे ट्विट आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात आज 5427 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2543 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1987804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 40858 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची यामध्ये नावे आहेत.

आतापर्यंत या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
जलसंपदा मंत्री जयंत पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
सहकारमंत्री बाळा साहेब पाटील
सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण
वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अह्वाड
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बंसोड़
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here