अरविंद सिंघल यांनी राममंदिरासाठी केले 11 कोटी रुपयांचं दान

उदयपूर (राजस्थान) – अयोध्यात उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांचे छोटे भाऊ अरविंद सिंघल यांनी 11 कोटी रुपयांचं दान दिलं आहे. हे राजस्थानमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे दान आहे.

अरविंद यावेळी म्हणाले की, मोठ्या भावाचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. याचा मला अत्यंत आनंद आहे. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या राम मंदिर आंदोलनात अशोक सिंघल यांची मोठी भूमिका होती. त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी अनेक आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.

अरविंद सिंघल यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी उदयपूरमध्ये दान जमा करीत असलेले पारस सिंघवी यांना दोन वेळा चेकच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा निधी दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी पाच कोटी आणि नंतर 6 कोटी रुपयांचा चेक दिला. सिंघवी यांनी सांगितलं की, राजस्थानमध्ये सिंघल कुटुंबाकडून देण्यात आलेलं दान आतापर्यंत राज्यातील सर्वात मोठी रक्कम आहे.

अरविंद सिंघल हे राजस्थानचा एक मोठे उद्योगपती आहेत. ते व्हॉल्कन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आहेत. खाण क्षेत्राव्यतिरिक्त त्यांची कंपनी विद्युत उपकरणेही तयार करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here