कोलकाता – भारतीय जनता पक्षाच्या तरुण महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. पामेला गोस्वामी असे या महिलेचे नाव असून ही महिला कारमधून ड्रग्सचा पुरवठा करत होती. पोलिसांनी पामेला हिच्यासह तिचा मित्र प्रोबिर कुमार डे यालाही अटक केली आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, भाजपा युवा मोर्चाची पर्यवेक्षक आणि हुगली जिल्ह्याची महासचिव पामेला गोस्वामी हिला शुक्रवारी कोलकाता पोलिसांनी अटक केली. न्यू अलीपूर भागातून तिला अटक करण्यात आली. पोलिसांना तिच्या गाडीमध्ये लाखो रुपयांचे कोकीन ड्रग्सही आढळूऱ्या साखळीचा भाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. न्यू अलिपूर रोडवर तिची कार पोलिसांनी अडवली आणि झडती घेतली असता कारमध्ये आणि तिच्या बॅगमध्ये 100 ग्राम कोकीनचा साठा आढळला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तसेच तिचा जवळचा सहकारी आणि भाजपा नेता प्रबिर कुमार डे यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.






