मुंबई (प्रतिनिधी) – मोठ्या बँकांचे एकत्रीकरण करण्यासह छोट्या बँका संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
अनेक मोठ्या उद्योगपतींना आर्थिक सवलती दिल्या गेल्या. त्यांच्या कर्जावर वॅन टाइम सेटलमेंट केले गेले. एखादी बँक जर चुकीचे काम करत असेल तर सर्वच बँकांना एकच नियम लावणे चुकीचे आहे. केन्द्रा व रिसर्व बँकांच्या नियमांमुळे अनेक छोट्या बँकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.






