अनोरे येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – अनोरे -ता. धरणगाव. जि. जळगाव दि.19 फेब्रुवारी रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चे औचित्य साधून ग्रामस्थ्यांचा सहकार्याने गावातील जेष्ठ नागरिक रमेश खंडू महाजन, नवनिर्वाचित सरपंच स्वप्नील महाजन आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण करण्यात आले. तसेच मान्यवरांचे हस्ते शिवाजी महाराजांचे, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच वीर एकलव्य यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच आयोजकांचा वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन करतांना मंगेश पाटील सर यांनी सर्व महापुरुषांचा कार्यावर प्रकाश टाकला. प्रसंगी रमेश नानांनी ही थोरपुरुषांनच कार्य सांगत गावाची एकात्मता अशीच टिकून राहावी असे प्रतिपादन केले. सरपंच स्वप्नील महाजन यांनी गावाचं विकास हाच ध्यास म्हूणन सर्व सदस्य बांधील राहतील असे वचन दिले.

raje-chatrapti-shivaji-maharaj-chowk

कार्यक्रम प्रसंगी गावाचे ग्रामसेवक शरद पाटील, प्रगतीशील शेतकरी दिनेश तायडे, योगराज नाना, ग्रामपंचायत शिपाई सुरेश पवार, प्रल्हाद पाटील, तसेच रामचंद्र हिलाल पाटील,सुनील पाटील,अधीकार पाटील,सुभाष पाटील,सुबोध खैरनार, किरण पाटील, ज्ञानेश्वर महाजन(समर्थ फोटोग्राफी अनोरे) हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश सुनील पाटील,कल्पेश पाटील, कुणाल खैरनार,हर्षल खैरनार, नामदेव पाटील,नितीन पाटील, सुधाकर महाजन,पंकज महाजन,मनोज पाटील,अमोल पाटील,कमलेश पाटील,विशाल इंगडे,वसंत पाटील,अमोल दिलीप पाटील,सागर पाटील , भावेश पाटील,मुरली खैरनार,नरेंद्र पाटील,योगेश पाटील,राकेश पाटील,पवन पाटील,दत्तू लक्षुमन महाजन यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here