मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – शिवजयंती निमित्त शिवसेनेच्या महिलांनी जुनी एम. एच. बी. दत्तमंदिर बोरीवली (पश्चिम) येथे हळदीकुंकू समारंभ साजरा केला. या समारंभात महिलांसाठी व्यसनमुक्ती मार्गदर्शन करावे. म्हणून शाखेच्या विभाग संघटक सौ. जागृती भोसले यांनी दिशा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा संघटक सौ. दिशा कळंबे यांना आमंत्रित केले होते. कळंबे यांनी नशाबंदी मंडळाचे पुस्तक देऊन व्यसनमुक्ती संदर्भात यावेळी प्रचार व प्रसार ही केला.






