मुंबई (प्रतिनिधी) – भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव याने आपल्या फेसबुक वॉलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हि़डीओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. त्याने व्हिडीओमध्ये आपला कधीही सुशांत सिंग होवू शकतो असं सांगितले आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा खेसारी लाल यादव हा आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भोजपुरी इंडस्ट्रीमधील काही लोकं माझा सुशांत सिंग राजपूत करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे.
खेसारी लाल यादव याने भोजपुरी इंडस्ट्रीमधील कोणाचे नाव न घेता इंडस्ट्रीमधील काही जणांवर निशाणा साधला आहे. लवकरचं माझा सुशांत सिंग राजपुत होण्याची दाट शक्यता आहे, असे त्याने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. जितकं प्रेम बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुशांतला मिळाले तेवढेचं प्रेम मला भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये मिळत आहे. त्यामुळे काही जणांना त्याचा त्रास होत आहे. पण मी इतका कमजोर नाही. कारण माझ्यावर प्रेक्षकांचे अतोनात प्रेम आहे, असे खेसारी लाल व्हिडीओमध्ये बोलत आहे.
इंडस्ट्रीतील काही मोजक्या लोकांना असे वाटत असेल की, मी सुशांत सिंग राजपूत
सारखे पाऊल उचलेन, पण मी तसे करणार नसल्याचे खेसारी लाल याने व्हिडीओत सांगितले आहे. माझ्या बाबतीत असे काही घडले तर माझे चाहते बिहार बंद करु शकतात. त्यामुळे इंडस्ट्रीतील अशा लोकांनी वेळीच सावध व्हावे. माझ्या विचारांवर अशा विरोधकांचा कोणताही परिणाम होणार नाही. मला आणि माझ्या कामाला विरोध करणाऱ्यांची संख्या या इंडस्ट्रीमध्ये मोठ्याप्रमाणात आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. पण ते पैशाने मला खरेदी करु शकत नाहीत.
मी भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये २०११ साली दाखल झालो आणि कमी कालावधीत उच्च शिखरावर पोहचला. माझे चित्रपट कमी कालावधीत हिट होतात. त्याचा माझ्या विरोधकांना त्रास होत आहे. त्यामुळेच माझा सुशांत सिंग राजपूत करण्याची तयारी काही जणांनी सुरु केली आहे. हे मला कळल्यामुळेचं मी हा व्हिडीओ तयार केला आहे. मात्र मी कुणाच्या अशा धमक्यांना आणि त्रासाला घाबरणार नाही. मी खंबीर आहे. आणि माझे चाहते माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मी निश्चित आहे.






