चाळीसगाव (प्रतिनिधी) – सामाजिक व शैक्षणिक कार्यात ठसा उमटविणारी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन या संस्थेमार्फंत शिवकार्याच्या स्फुर्तीचा जागर व्हावा या उद्देशाने अनेक शालेय मुलांना शिवचरित्रात्मक पुस्तकाचे व अन्य प्रेरणा देणार्या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी युवक युवतींना तथा शालेय मुलांना वाचनाची आवड व्हावी,युवा वर्गाला शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा मिळावी,छत्रपतींचे कार्य,कर्तृत्व समजुन घेता यावे म्हणुन शिवजयंतीचे औचित्य साधुन पुस्तके वाटपाचा स्तुत्य उपक्रम घडवुन आणला.या प्रसंगी त्यांच्याकडुन शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला.त्यासह प्रत्येकांचे जीवन सार्थकी लागावे म्हणुन इतर प्रेरणादायी पुस्तकांची ओळखही अशोक राठोड यांनी करुन दिली.
त्यांनी या उपक्रमाद्वारे शिवचरित्र, विचार नियम आशा आणि विश्वास, विचार नियम क्रांती, विचार नियम आणि क्षमेची किमया, गीता प्रवचने, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवन विद्याचा, खरा धर्म मानव धर्म, हितगुज विद्यार्थ्यांशी, गुलामगिरी, तुमचे भाग्य तुमच्या विचारात, जीवनविद्या समज गैरसमज, लोककल्याणकारी बळीराजा, अभ्यास कैशल्य, संतांचे सामाजिक व धार्मिक विद्रोह, ज्ञानदीप डॉ बाबासाहेब आंबेडकर एक अभ्यास, लावण पिवशी, फुले शाहू आंबेडकर समतेचे तिर्थकार, अग्निपंख,चारोळी ही प्रेरणा देणारी पुस्तके एकोणाविस मुलांना वाटप केली.याकरीता त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.






