उस्मानाबाद – कोरोना लसीच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लस घेतल्यानंतर तब्बल 2 आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता. त्यामुळे लसीच्या प्रभावबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घेण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतरही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगत मी घेतली ,तुम्ही पण घ्या असा प्रचार जिल्हाधिकारी यांनी केला होता.






