मुंबई – मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे यांनी कोरोनावरची लस घेतली आहे. मुंबईतील के. ई. एम हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी लस घेतली.तसंच सर्वसामान्यांना विशेष आवाहनही केलं आहे.
मुंबईतील के. ई. एम हॉस्पिटलमध्ये जाऊन नांगरे पाटील यांनी कोरोनावरील लस घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार देखील मानले. कोरोना काळात आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं.
विश्वास नांगरे पाटील यांचं आवाहन काय…?
“जय हिंद… मी विश्वास नांगरे पाटील.. मी आज के. ई. एम हॉस्पिटलमध्ये येऊन कोरोनावरची लस घेतली आहे. या लसीमुळे निश्चितपणे फ्रंटलाईनवर काम करणारे पोलिस, आरोग्य कर्मचारी यांना फायदा होणार आहे. मुंबई पोलिसांचे 99 जवान या कोरोना काळात शहीद झाले. आपण सगळ्यांनी मनात कोणतीही किंतु-परंतु न ठेवता लस घ्यावी. जर आपण सुरक्षित असू तर कुटुंब सुरक्षि असेल आणि कुटुंब सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित असेल. त्यामुळे सगळ्यांनी लस घ्या…”, असं आवाहन नांगरे पाटील यांनी केलं आहे.







