निसर्गमित्र जळगावतर्फे महाराष्ट्रात प्रथमच महिलांसाठी पक्षीगणनेचा अभिनव उपक्रम

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – दि.८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच महिलांसाठी पक्षीगणना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या अभिनव उपक्रमाचे आयोजन निसर्गमित्र जळगावतर्फे पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ व शिल्पा गाडगीळ यांनी केले आहे.
या महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन पक्षीगणना सप्ताहात महिलांनी ‘सिटीझन साइंटिस्ट’म्हणून पक्षी निरीक्षण व गणनेत आपले योगदान द्यावे व पक्षी संवर्धनाच्या,चळवळीत वसुंधरेच्या लेकींनी पुढाकार घ्यावा हा या उपक्रमामागील हेतु आहे.सप्ताह दि.१ ते ८ मार्च या कलावधीत साजरा करण्यात येणार आहे.

पक्ष्यांचा फारसा परिचय नसलेल्या भगिनींनीसुद्धा या गणनेत भाग घेतला पाहिजे ही भूमिका मनात ठेवून पक्ष्यांची गणना करणे सोपे जावे यासाठी आपल्या परिसरात दिसणार्‍या निवडक १०-पक्ष्यांची छायाचित्र व त्यांची मराठी व इंग्रजी नावे गुगल फॉर्म मध्ये दिली आहेत.गणना फॉर्म मराठी अथवा इंग्रजीत भरण्याची सोय असल्याने सर्व भाषिक महिलांना यात सहभाग घेता येईल.

कोरोनाची सर्व बंधने पाळून पक्षीगणनेसाठी कोठेही बाहेर जायचे नसून, आपल्या घराच्या खिडकीतून, गॅलरीतून किंवा गच्चीतून दिसणाऱ्या पक्षांची गणना करुन गुगल फॉर्मवर भरून पाठवायची आहे. तरी जास्तीत जास्त भगिनींनी या अभिनव उपक्रमात सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी मो.क्र.9423973115 /8999809416 यावर संपर्क साधावा असे आवाहन पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ व सौ.शिल्पा गाडगीळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here