आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांना एकापाठोपाठ करोना होत असल्याने, या मंत्र्यांना करोनाची लागण होतेय हा खराखुरा करोना की, सरकारी करोना? म्हणजे अधिवेशन टाळण्यासाठी करोनाचा सहारा घेतला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पण सामान्य जनता दूधखुळी नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे. अधिवेशन टाळण्यासाठी मंत्र्यांना होणारी करोनाची लागण ही सरकारी तर नाही ना?अशी शंका उपस्थित होण्यासारखी ही परिस्थिती आहे. यासाठी करोना रूग्णसंख्येत वाढ ही अचानक होऊ लागली. गेल्या सोमवारी अचानक साडेतीन हजाराच्या वर वाढलेली करोना रूग्णांची आकडेवारी त्यास कारणीभूत असल्याचे कारण पुढे केले जात आहे. आतापर्यंत अनेक मंत्र्यांना करोना झाला आहे. याची यादीच देता येईल. पण प्रश्न उरतो तो असा की, मंत्र्यांना होणारा करोना हा खोटा आहे की खरा? जर तो खोटा असेल तर जनतेला उल्लू बनवण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू आहे, असे आपण म्हणू शकतो. अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांना, लोकप्रतिनिधीं सामोरे जावे लागू नये याचसाठी हा सगळा खटाटोप असल्याचे दिसून येत आहे. मंत्र्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यास या म्हणण्यात तथ्य असल्याचे दिसून येते.

“मला करोनाची लागण झाली आहे. माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, परंतु प्रकृती उत्तम आहे.” करोना पॉझिटिव्ह माणसाची प्रकृती उत्तम कशी काय असू शकते. करोनामध्ये ताप येतो, कोरडी सर्दी होते, घसा खवखवतो, घसा दुखतो, श्वास घ्यायला त्रास होतो, चालताना धाप लागते, अशक्तपणा जाणवतो, अशी एक ना अनेक लक्षणे दिसून यायला पाहिजेत वास्तविक. पण करोनाची लागण झालेल्या मंत्र्यांना यापैकी काहीच लक्षणे आढळून येत नाहीत. तरीही त्यांना करोना झाल्याची टेस्ट पॉझिटिव्ह येते, हे जगातील नववे आश्चर्यच म्हणावे लागेल. बरे यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा काही पुरावा असतो का? लॅबमध्ये करोना टेस्ट केल्याचे लॅबचा रिपोर्ट वगैरे…

त्यांनी तो जनतेत प्रसिद्ध करावा. पुरावा दाखवावा ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे पुरावा जनतेने भलेही मागितला नाही तरीही तो सादर करणे हे त्यांनी त्यांचे कर्तव्यच समजले पाहिजे. या कर्तव्याची पूर्ती जेव्हा ते करतील तेव्हाच त्यांना खराखुरा करोना झालाय की हा सरकारी करोना आहे? हे समजून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here