दादरा नगर हवेलीच्या अपक्ष खासदाराची मुंबईत आत्महत्या…

मुंबई – ५९ वर्षाचे दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये डेलकर यांचा मृतदेह आढळून आला आहे. मुंबई पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस पथक हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. पोलीसांना घटनास्थळी एक गुजराती भाषेमध्ये सुसाईड सापडली आहे.

मोहन डेलकर यांच्या पश्चात पत्नी कालाबेन डेलकर आणि मुलगा अभिनव, मुलगी दिविता असे कुटुंब आहे. १९८९ साली डेलकर हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते अपक्ष खासदार म्हणून बऱ्याच वेळा निवडून आले. पोलीस ही हत्या आहे की आत्महत्या आहे याचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here