कोल्हापूरच्या लोहिया ज्युनी.कॉलेजची सोनाली फोंडे व्होकेशनल विभागात प्रथम.

गारगोटी (सुभाष माने) – भुदरगड तालुक्याच्या मिणचे खोऱ्याच्या गिरगांव धनगरवाड्यावरील अत्यंत गरीब कुटुंबातील कु.सोनाली विठ्ठल फोंडे हिने कोल्हापूर च्या एस एम लोहिया ज्युनी.कॉलेजच्या व्होकेशनल विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला.तिच्या या यशाबध्दल तिचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
आई वडिल अशिक्षित, घरचे दारिद्र्य, डोंगरकपारीत उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. कोणतीही सुखसुविधा नाही अशा कठिण परिस्थीतीत पाचवीला असताना सोनालीच्या कुटुंबाने गाव घर सोडले व ती आई वडिल भावासमवेत कोल्हापूरच्या बोंद्रेनगर ला राहावयास आली. दहावी नंतर तीने तिच्या आवडीची व्होकेशनल शाखा निवडली व अथक परिश्रम करून तीने हे यश संपादन केले.तिच्या या यशाने तिच्या कुटुंब व समाजाची मान उंच झाली आहे.प्रामाणिक कष्टापूढे परिस्थीतीलाही झुकावे लागते तेव्हा यश मागोमाग धावून येते हे सोनाली ने आपल्या या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. सोनालीचे वडिल आजारी अाहेत.आई आजघडीला दुसऱ्याची धुणीभांडी करते. सोनालीला शासकिय सेवेत उच्चपदस्त नोकरी करण्याची इच्छा आहे पण बिकट परिस्थीतीमूळे तिला पुढील शिक्षण पुर्ण करता येईल की नाही हे सांगता येत नाही.यासाठी तिला मदतीची गरज असल्याचे समजते.या कामी तिला तिचे मार्गदर्शक शिक्षक डी पी नाटले ( हेदवडे ), शाळेचे प्राचार्य व तिचे सर्व शिक्षक, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभलेचे सोनालीने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here