सीबीएसईच्या दहावी परिक्षेत महिमा संघवीला ९६.२० टक्के गुण.

गारगोटी (सुभाष माने) – भारत सरकारच्या केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( CBSE) दहावी बोर्ड परिक्षेत कोल्हापूर च्या विद्ग्योर हायस्कूल ची विद्यार्थीनी कु.महिमा शितलकुमार संघवी हिने ९६.२० टक्के मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.याबध्दल तीचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
सीबीएसई ही संस्था भारत सरकार ची माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षणाची सोय करणारी सरकारी संस्था आहे.या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक सक्षमपणे वाढवण्यासाठी व पूढे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी महत्वाची मानली जाते.देशात अनेक ठिकाणी ही शासकिय विद्यालये आहेत. विशेषत: शासन सेवेत काम काम करणाऱ्या नोकरांच्या मुलांना ही विद्यालये महत्वाची मानली जातात.
कु.महिमा या विद्यार्थीनीने या या यशाबध्दल या विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच पालक वर्गाचे चांगले सहकार्य मिळाल्याचे सांगितले. यापुढील काळात मी या शिक्णातून पूढे उद्योग व्यवसायात क्रियाशील राहाणार असून सामाजिक कार्यातही स्वत:ला वाहून घेणार तसेच अर्थ शास्त्राची पदवी घेवून पुढील वाटचाल सुरु ठेवणार असल्याचे तीने याप्रसंगी सांगितले.या यशासाठी आई आरती संघवी,वडिल शितलकुमार संघवी.शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक अविनाश माळी व इतर सर्व सहाय्यक विषय शिक्षक, मार्गदर्शिका अश्वीनी तेंदवानी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे कु.महिमा हिने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here