कुरार पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास केली अटक

मुंबई (हितेश मिस्त्री) – दिनांक ०६/०७/२०२० रोजी कुरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना त्यांना ओमकार एसआए, कणसे मार्ग कुरारगाव, मालाड पुर्व मुंबई या ठिकाणी खालील इसम व त्याचे साथीदार ऑटो-रीक्षात बसून संशयास्पद रीत्या फिरताना दिसून आले. नमुद इसम पोलीसांना पाहून पळून जाव लागले. त्याचा पाठलाग केला असता त्यांचेपैकी तीन इसम पळून गेले व एका इसमास त्याचे ताब्यातील ऑटो रीक्षा क MEI02DU2376 सह पकडण्यात आले. अधिक चौकशी अंती सदर आरोपी अभिलेखावरील मो/वाहन चोरी, घरफोडी गुन्हयातील आरोपी असून त्याचेवर दिंडोशी पो. ठाणेस घरफोडी/चोरीचे ५ गुन्हे असल्याची माहिती मिळाली म्हणून कुरार पोलीस ठाणेस गु.र.क्र. ४०५/२०२०, कलम ४०१ भादवि गुन्हा नोंद करून त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. अटक आरोपीताचे नाव पत्ता – शोहेब इमाम खान २१ वर्षे, राठी- बी एम सी कॉलनी, ए १ स्विटमार्ट शेजारी, संतोषनगर, गोरेगाव (पूर्व) मुंबई दिंडोशी पोलीस ठाणे शोहेब इमाम खान २१ वर्षे, याचा गुन्हे अभिलेख अ.क्र. गुरक्र. व कलम | गुरक. २९३/१८ क. ३८०,३४ भा.द.वि १. | गुरक. ३२१/१८ क. ३८० भा.द.वि ५. | गुरक.५५६/१७ क.३९५,५०४,५०६,३४भा.द.वि . | गुरक. १८६/१८ क. ३८० भा.द.वि ३. | गुरक. ४२४/१८ क. ४५४,३८० भा.द.वि तसेच पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात खालील नमुद गुन्हे उघडकीस आले. १) कुरार पोलीस ठाणे. गुरक. १६५/२०२० कलम. ३७९ भादवि. २) कुरार पोलीस ठाणे. गुरक. १४२/२०२० कलम ३७९ भादवि ३) वालीव पोलीस ठाणे. गुरक. ६००/२०२० कलम ३७९ भादवि ४) दिंडोशी पोलीस ठाणे गुरक. १०५/२०२० कलम ४०१ भादवि. ५) दिंडोशी पोलीस ठाणेचे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. अटक आरोपीताकडून हस्तगत मालमत्तेचे वर्णन: १) ब्लॅक पर्पल रंगाची हीरो एच एल डिलक्स मोटरसायकल क MH47 AR 7413 ___ इंजिन नंबर 20213 चेसीस नंबर 41071 अंदाजे किमत ४५०००/- रुपये (कुरार पोलीस ठाणे. गुरक. १६५/२०२० कलम. ३७९ भादवि.) २) ऑरेज रंगाची होंडा डीओ मोटरसायकल क MH47 AA 2963, इंजिन नंबर 169382 चेसीस नंबर 103113 अंदाजे किमत ४०,०००/- रुपये (कुरार पोलीस ठाणे. गुरक. १४२/२०२० कलम ३७९ भादवि) ३) होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क MH02 DC 7228, इंजिन नंबर JC73ET2137082 चेसीस नंबर ME4JC738GJT056273 अंदाजे किमत ३०,०००/- रुपये (वालीव पोलीस ठाणे. गुरक. ६००/२०२० कलम ३७९ भादवि)
सदरची कारवाई मा. श्री. दिलीप सावंत सो अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रा. विभाग मुंबई, मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ- १२ डॉ. डी. एस. स्वामी, मा. सपोआ समतानगर विभाग सुभाष जाधव कुरार पोलीस ठाणेचे वपोनि श्री. बाबासाहेब साळुखे, पोनि चाळके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घार्गे, पोउपनि सातार्डेकर, पोह./बहीरम, पोना/ भोगले, मोरे, पोशि/ तांबोळी, सकट, वेदांते, जोगलपुरे, सपकाळे, साळवी, यांनी नमुद गुन्हयाचा | तपास करून एकूण ५ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here