बेलापूर (सीबीडी) (महेश खैरनार) – वाशी पोलीस ठाणे हद्दीत आणि परिमंडळ १, वाशी, नवी मुंबई चे हद्दीत पार्क केलेल्या मोटार सायकल, स्कुटी तसेच रिक्षा चोरीचे गुन्हे सतत होत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई यांनी दिलले होते.त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, नवी मुंबई श्री. पंकज डहाणे यांनी सन २०२० मधील दाखल वाहन चोरीचे गुन्हे त्वरीत घडकीस आणण्याकरीता वाशी पोलीस ठाणेकडील पोलीस उप निरीक्षक, काशिनाथ माने यांचे नेतृत्वा खाली एक स्वतंत्र विषेश पथकाची स्थापन केली होती.
महाराष्ट्र शासनाकडुन संपर्ण राज्यात कोराना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना घोषीत करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई शहर लॉकडाउन करून संचारबंदीचे आदेश जारी केलेले असताना सुध्दा सदर विशेष पथकाने सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त, वाशी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र प्रयत्न करून लॉकडाउनच्या काळामध्ये सुमारे २०० हुन अधिक सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक तपास करून निश्चितपणे सापळा लावुन खालील नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपीस सापळा रचुन ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे केलेल्या कौशल्यपुर्वक चौकशीमध्ये वाशी पोलीस ठाण्याकडील खालील नमुद गुन्हयांची आरोपीने स्वखुशीने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांस दिनांक १४/०७/२०२० रोजी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी नाव पत्ता :- अमित युवराज सकपाळ, वय ३५ वर्षे, रा. साईदिप अपार्टमेंट, रूम नं.२०२, सेक्टर नं. ११, जुहुगांव, नवी मुंबई मुळ रा. मु. पो. तासगांव, जाधववाडी, ता. जि. सातारा. सदर अटक आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये वाशी पोलीस ठाणे येथे दाखल असलेले खालील नमुद गुन्हे उघडकीस आणण्यात यश प्राप्त झालेले आहे. १) वाशी पोलीस ठाणे गु. रजि. नं. २८/२०२० ५०,000/-रू.किं,ची काळी पिवळी ॲटो रिक्षा क्रमांक एमएच/४३/एसी/९१३१
२) वाशी पोलीस ठाणे गु.रजि नं. २२४/२०२० भादवी कलम ३७९ ।७४,०००/-रू.किं,ची सिल्व्हर रंगाची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मो. सायकल एमएच/४३/बीक्यु/९०१४
३) वाशी पोलीस ठाणे. गु. रजि. नं. २२५/२०२०, भादवी कलम ३७९, ६०.000/-रू.किं,ची काळया रंगाची रॉयल इनफील्ड कंपनीची बुलेट मो.सायकल क्रमांक एमएच /४३/एयु/५२७९
४) वाशी पोलीस ठाणे गु. रजि. नं. २२९/२०२० भादवी कलम ३७९, १०,000/-रू.किं,ची बजाज प्लॅटीना मो.सायकल एमएच/१४/बीपी/७६१५
५) वाशी पोलीस ठाणे गु. रजि. नं. २३२/२०२० भादवी कलम ३७९, ४०,०००/-रू.किं,ची होंडा एक्टीव्हा ५G क्रमांक एमएच /०३/डीएम/०८६८
६) (०१) वाशी पोलीस ठाणे गु. रजि. नं. २३३/२०२०, ४०,000/-रू.किं,ची पांढ-या रंगाची सुझुकी अॅक्सेस कंपनीची स्कुटी क्रमांक एमएच /४३/बीएस/३७०५
(२) ५०,000/-रूपये किं. ची काळया रंगाची रॉयल इनफील्ड कंपनीची बुलेट मो. सायकल क्रमांक एमएच /४३/एव्ही/७३४९
७) वाशी पोलीस ठाणे गु.रजि. नं.२३७/२०२०, ४०,000/-रू.किं,ची ग्रे रंगाची होंडा कंपनीची एक्टीव्हा ५७ क्रमांक एमएच /४३/बीक्यु/७७९५, ३,६४,000/- रूपये एकुण किंमतचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर अटक आरोपीस दि.१८/०७/२०२० रोजी पावेतो मा. न्यायालयाकडुन पोलीस कोठडी रिमांड मंजुरी प्राप्त असुन सदर अटक आरोपीकडे अधिक चौकशी करून इतर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले आणखीन गुन्हे उघडकीस आणत आहोत.
पोलीस आयुक्त संजय कुमार, सह. पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, पो. उप आयुक्त परिमंडळ १, वाशी पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण अधिकारी काशिनाथ माने, पोलीस पथक-पोलीस हवालदार- शैलेंद्र कदम, पोलीस नाईक सुनिल चिकणे, निलेश किंद्रे पोलीस शिपाई अविनाश मोकळे, उत्तरेश्वर जाधव यांनी यशस्वी कामगिरी पार पाडलेली आहे.







