मार्च महिन्यात ११ दिवस बँक राहणार बंद…

मुंबई (प्रतिनिधी) – आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणून मार्च महिना ओळखला जातो. येत्या मार्च महिन्यात जवळपास ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकेशी संबंधित काही महत्त्वाची काम असतील तर नागरिकांनी ती याचं महिन्यात करुन घ्यावी. जर बँकेत कोणत्याही कामासाठी जावे लागले तर कोणत्या दिवशी बँका बंद आहेत. त्यावर जरा लक्ष द्या आणि आपली कामे लवकरात लवकर करुन घ्या. नाहीतर उगाचच तुमची बँकेची फेरी वाया जाण्याची शक्यता आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशात कार्यरत असलेल्या बँका या रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात काही अतिरिक्त सुट्ट्या आणि काही प्रादेशिक सण सुद्धा असतात. त्यामुळे सणांच्या दिवशी प्रादेशिक पातळीवर सुट्ट्या जाहीर कराव्या लागतात.

५ मार्च रोजी मिझोरममध्ये सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. तर ११ मार्च रोजी महाशिवरात्री असल्याने देशभरातील अनेक राज्यात बँकाचे कामकाज बंद राहणार आहे. १३ मार्च रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. १४ मार्च रोजी रविवार असल्यामुळे बँकांची साप्ताहिक सुट्टी असणार आहे. १५ मार्चला सोमवार असून काही बँकांच्या युनियनने संप पुकारला आहे. त्यामुळे बँका बंद राहण्याची शक्यता आहे. २१ मार्च रोजी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे. २२ मार्चला बिहार दिवस आहे. त्यामुळे बिहारमध्ये बँका बंद असतील. २७ मार्च रोजी महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद असल्याचे पाहायला मिळेल. २८ मार्च रोजी रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे. तर २९ आणि ३० मार्चला होळीचा सण असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here