भारत-इंग्लंड यांच्यात आज तिसरा कसोटी सामना, ‘हे’ बदल अपेक्षित…

अहमदाबाद – जगातील सर्वाधिक प्रेक्षकक्षमतेच्या स्टेडियममध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वल्लभभाई पटेल स्टेडियमवर ५५ हजार प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. आज बुधवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.

तिसरा कसोटी सामना
वेळ : दुपारी २.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ (हिंदी) आणि एचडी वाहिन्या

जगातील सर्वात मोठ्या या स्टेडियमचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या उदघाटन सोहळ्याला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केन्द्रिय क्रीडामंत्री किरण रिजिजू, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, उपस्थित राहणार आहेत. दुपारी २.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

कमाल १५ षटके टाकण्याची क्षमता असलेल्या पंडय़ाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून विचार केला जाऊ शकतो.अश्विनला (३९४ बळी) कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी ६ बळींची गरज आहे.१००वा कसोटी सामना खेळणारा इशांत भारताचा ११वा खेळाडू तर कपिलनंतर दुसरा वेगवान गोलंदाज आहे.गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या अनिल कुंबळेला (६१९ बळी) मागे टाकण्यासाठी इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला (६११ बळी) ९ बळींची आवश्यकता आहे.

संघ-
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

इंग्लंड : जो रुट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्‍स, झॉक क्रॉवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here