घरांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता ! मुंबई गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण…

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – गेल्या वर्षभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात घरांच्या विक्रीमध्ये मोठ्याप्रमाणात घट झालेल्या पाहायला मिळली होती. मात्र आता लॉकडाऊननंतर देशासह मुंबई पुन्हा पूर्वपदावर येत असताना मुंबईसह देशात घरांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार देशातील जवळपास २० टक्के लोक घर खरेदी करण्याच्या तयारित आहेत. गेल्या वर्षी या ग्राहकांची संख्या केवळ १० टक्के होती.

जगातील अल्ट्रा रिच नागरिकांनी मुंबईसह भारतात गुंतवणुकीवर भर दिला आहे. त्यानंतर अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीला प्राधान्य दिले जात आहे. नाईट फ्रँक द वेल्थ रिपोर्टनुसार २०२१ मध्ये घरांच्या किमंतीमध्ये ७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेचं नाईट फ्रँकच्या सर्वेक्षणानुसार भारतात ४१ टक्के अल्ट्रा रिच नागरिकांनी रिसॉर्ट्स किंवा सागरी भागात नवी घरं खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ज्यांच्याकडे कमीतकमी ३ कोटी डॉलर्सची संपत्ती आहे, तेच नागरिक गुंतवणुक करण्याच्या तयारित आहेत. हे सर्वजण आपले नविन घर खरेदी करु इच्छित आहेत. याची तीन प्रमुख कारणे आहेत. जे आपले घर अपग्रेड करण्याच्या तयारित आहेत. एखादे नवे हॉलिडे होम खरेदी करणे आणि स्थायी स्वरुपात इतर ठिकाणी शिफ्ट होणे.

नविन घरांची निवड करताना हे नागरिक स्थानिक ठिकाणची वाहतुक व्यवस्था कशी आहे. तिथे इंटरनेट कनेक्टिव्हीटीची सुविधा आहे का ? याची पहिल्यांदा पडताळणी करतात. भारतात गुंतवणुक करताना ऑफिस आणि लॉजिस्टीक्सला प्राधान्य दिले जात आहे. भारतीय नागरिक हे आपल्या संपत्तीच्या १७ टक्के वाटा कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुक करण्यासाठी वेगळा ठेवतात. तर जागतिक स्तरावर ही संख्या २१ टक्के आहे.

भारतीय बाजारपेठेत २०२१ हे वर्ष बांधकाम व्यवसायासाठी उत्तम वर्ष असल्याचे नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले आहे. या वर्षी पर्यावरण, सामाजिक आणि ईएसजी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुक वाढण्याची शक्यता बैजल यांनी व्यक्त केली आहे. जगातील २६ टक्के लोक हे आपल्या हक्काच्या घराच्या शोधात असतात. त्याचा लाभ या क्षेत्राला होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here