देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण होणार?

modi

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या जनधन किंवा पीएम किसान योजना तसेच इतर योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकांचे आता खासगीकरण होणार असल्याचे संकेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्वच क्षेत्रात सरकारनं असण्याची गरज नाही. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही तर व्यवसायाला सहकार्य करणं ही सरकारची भूमिका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी Department of Investment and Public Asset Management (DIPAM) विभागाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम या राष्ट्रीयकृत बँका करतात.

जर या बँकांचे खासगीकरण केलं तर केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहचणार असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाचा विषय हा मोदी सरकारच्या अजेंड्यावर आहे. या बँकांचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘बॅड बँके’चा विषय काढला होता. त्यामुळे ज्या बँका तोट्यात चालल्या आहेत त्यांचे खासगीकरण होणार हे नक्की झालं होतं. आता पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण होणार याचे संकेत मिळत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here