चंद्रपूर – सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला आहे. या दुर्घटनेत 5 वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 पुरुष 2 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. तसेच सुमारे 20 वऱ्हाडी जखमी झाले आहेत. रत्नापूर येथून विवाह संभारभानंतर वऱ्हाडांना घेऊन मिनीट्रक एकारा येथे जात होता. स्थानिक नागरिकांनी जखमींना सिंदेवाही रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातात वाहन चालकासह 2 पुरुष 2 महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. साहिल कोराम (14), रघुनाथ कोराम (41), कविता संजय बोरकर (35), वीणा घनश्याम गहाणे (26), वैभव लोमेश सहारे(30) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातात सुमारे 20 वऱ्हाडी जखमी झाले आहेत. रत्नापूर येथून विवाह आटोपून वऱ्हाड एकारा येथे जात होते. स्थानिक नागरिकांनी जखमींना सिंदेवाही रुग्णालयात दाखल केले आहे.






