फरार उद्योगपती नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – पंजाब नॅशनल बँकेचे करोडो रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये फरार झालेला तथकथित उद्योगपती नीरव मोदींच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनमधील न्ययालयात २ वर्षे या खटल्याची सुनावनी सुरू होती. नीरव मोदीने भारतातील प्रत्यार्पणाला या कोर्टात आव्हान दिले होते. या खटल्यावर सुनावनी पूर्ण झाल्यावर ब्रिटनच्या विटमिनस्टर जिल्हा न्यायालयाने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग शेवटी मोकळा केला.

नीरव मोदीविरोधात भारतात एक प्रकरण प्रलंबित असून त्याला नीरव मोदिला उत्तर द्यावे लागणार आहे. पुरावे नष्ट करणे आणि साक्षीदारांना धमकावण्याचा ठपका त्याच्यावर या खटल्यात ठेवण्यात आला आहे. नीरव मोदिला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य उपचार अणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा पुरवण्यात येतील, असे ब्रिटनच्या विटमिनस्टर जिल्हा न्यायालयाने आदेशांत म्हटले आहे.

फरार उद्योगपती नीरव मोदीला ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी १३ मार्च २०१९ रोजी अटक केली होती. त्यानंतर तो वँड्सवर्थ तुरुंगात आहे. नीरव मोदी व्हिडिओ काँफेरेन्सद्वारे सुनावणीला हजर होता. जिल्हा कोर्टाचा हा निर्णय ब्रिटनच्या गृह सचिव प्रीति पटेल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी नीरव मोदीला द्यायची की नाही, याचा निर्णय त्या घेतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here