आत्महत्येसाठी तरुणाचे रेल्वे ट्रॅकवर लोटांगण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण…

मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई जवळील पालघर जिल्ह्यातील विरार रेल्वे स्थानकावर एका तरुणाने चक्क आत्महत्येसाठी रेल्वे रुळावर लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाचा जीव वाचू शकला.

ही सर्व घटना रेल्वे प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र हा तरुण आत्महत्या करत असताना त्याला वाचवण्यासाठी गर्दीतून कोणीही पुढे आले नाही. तिथे उपस्थित असलेल्या गर्दीने फक्त आरडाओरड आणि गोंधळ सुरु केला. कुणीही रेल्वे रुळावर जावून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला नाही. समोरच्या प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीस धावून आल्यानंतर काही जणांनी रेल्वे रुळावर धाव घेतली आणि रेल्वे पोलीसांना मदत केली.

आईच्या निधनाचे दुख पचवू न शकल्यामुळे हा तरुण तणावात होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला आणि टोकाचे पाऊल उचलले. त्याचे दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. रेल्वे पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला. त्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जवानाच्या धाडसाचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
या बातमीचा सीसीटिव्ही व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here