मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर देखील या प्रकरणात आरोप झाले आहेत. पूजाचे त्यांच्यासोबत संबंध होते, असं देखील म्हटले जात आहे.
या पार्श्वभूमीवर आता पूजा चव्हाणच्या वडिलांची एक भावनिक प्रतिक्रिया आली असून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशाराच दिला आहे. ‘सध्या पूजाची चाललेली बदनामी थांबली नाही, तर मला कुटुंबासोबत आत्महत्याच करावी लागेल’, अशा शब्दांत पूजाच्या वडिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यासोबतच, पूजाच्या संपूर्ण कुटुंबाने ही बदनामी त्वरित थांबवावी अशी मागणी केली आहे.






