नाशिक-पेठ मार्गावरील सावळघाटातील अपघातात दोन ठार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – नाशिक-पेठ-धरमपूर या रस्त्याची कित्येक वर्षांची दैनावस्था दूर झालेली असताना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने व जुजबी अपवाद वगाळता रस्ता दुपदरी वाहतुक योग्य झालेला असल्याने माल वाहतुक करणारी ट्रकची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली असल्याचे दिसून येते.

या रस्त्याने वाहने भरधाव वेगाने मार्गक्रमण करीत असल्याने आज पुन्हा सावळघाटात दुपारी २ वाजे दरम्यान नाशिकहुन गुजरातकडे येणाऱ्या ट्रकला (क्रमांक RJ18, GB 2077) वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने धडक दिल्याने आंबेगण ता . दिंडोरी येथीलं श्रावण संतू गायकवाड (वय ४२) व संजय साहेबराव बोंबले, (वय ३८) या दोन दुचाकीस्वारांचा अक्षरशः चेंगरून घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, ट्रक उलटून बॅरिकेट तोडून बाजूला जाऊन पडली होती. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here