श्रीहरीकोटातून अवकाशात झेपावणार इस्रोचे पीएसएलव्ही – सी ५१ रॉकेट; अॅमेझॉनच्या जंगलतोडीवर ठेवणार लक्ष

बंगळुरू – भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोच्या पीएसएलव्ही – सी ५१ अँमेझॉनिया १ या मोहिमेचे काऊंट डाऊन सुरू झाले असून आज (रविवार) सकाळी १० वाजून २४ मिनिटींनी उपग्रह अवकाशात झेपावणार आहे. काल पासूनच उपग्रह सोडण्याची लगबग आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये आणि बंगळुरातील इस्रोच्या कार्यालयात सुरू झाली आहे.

पोलार सॅटेलाईट लाँन्च व्हेईकल श्रेणीतील इस्रोची ही ५३ वी मोहिम आहे. या मोहिमेतून अॅमेझॉनिया हा ब्राझीलचा उपग्रह अवकशात सोडण्यात येणार आहे. सोबतच इतर १८ लहान उपग्रहांचाही यात समावेश आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील स्पेस सेंटरमधून ही मोहिम राबविण्यात येत असून इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू असून तेथून प्रक्षेपणावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. ही मोहिम सकाळी साडेदहा वाजता राबविण्यात येणार आहे. मात्र, हवामानाची स्थिती पाहून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

सकाळी ९ वाजता मोहिमेचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. अॅमेझॉनिया ही इस्त्रोची व्यावसायिक मोहीम आहे. ब्राझीलचा अॅमेझोनिया उपग्रह रिमोट सेन्सिंगची म्हणजेच पृथ्वीच्या भूपृष्ठाची माहिती पुरवणार आहे. हा उपग्रह अॅमेझॉन जंगलातील वृक्ष तोडीवर निगराणी ठेवणार असून याचा देशातील शेती क्षेत्रातालाही फायदा होणार आहे. मागील काही दिवसांत अॅमेझॉन जंगलातील वृक्षतोड वाढली असून त्याचा पर्यावरणाला फटका बसला आहे. अॅमेझॉनच्या जंगलाला आग लागल्याच्याही घटना घडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here