शिर्डी (प्रतिनिधी) – येथील गणेशवाडीतील गल्ली नंबर सहा मधील नविन पिण्याच्या पाईप लाईनच्या कामास अखेर सुरुवात झाल्याने आता या भागातील पाणी समस्या मार्गी लागण्यात मदत होणार आहे.
यावेळी नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी सांगितले, की गणेशवाडी प्रभागात विकास कामांची मालिका सुरु आहे. रस्ते, ड्रेनेज लाईन आदीसह मुलभुत सुविधांची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. गल्ली नंबर सहा मध्ये नविन पाईप लाईन टाकण्यात यावी अशी गेल्या अनेक दिवसा पासुनच नागरिकांची मागणी होती.अखेर या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
गणेशवाडी प्रभाग समस्यामुक्त करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न चालु असतात. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे मार्गी लागत आहे. यासाठी माजी व विदयमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरपंचायतचे पदाधिकारी, मुख्याधिकारी व प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे कोते यांनी सांगितले. यावेळी दिलीप कोते, पाणीपुरवठा विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे, राजेंद्र इंगळे, संपत हतांगळे, जिजा म्हस्के, चव्हाण उपस्थित होते.






