आवाज २०२०: कोविड – १९ युवा योद्धा कृतज्ञता सोहळ्याची पत्रकार परिषद

मुंबई – (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन (स्वायत्त महाविद्यालय) विस्तार केंद्र, अनुभव युवा प्रशिक्षण केंद्र यांनी युवा योद्धांना कृतज्ञता प्रदान करण्यासाठी “आवाज २०२०: कोविड – १९ युवा योद्धा कृतज्ञता सोहळा” आयोजित केला होता.

दरवर्षीप्रमाणे युवांचा आवाज आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करून युवाना असेच कार्य अविरत करत राहण्यासाठी प्रोस्ताहित करण्यासाठी अनुभव प्रशिक्षण केंद्राने शनिवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी झूम च्या माध्यमातून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अंतर्गत कोविड – १९ सारख्या कठीण काळात देशाची सुरक्षा करणाऱ्या मुंबई मधील २१ शूर युवक – युवतींचा सम्मान करण्यात आला. युवा वर्गाच्या चुका आपण नेहमीच पुढे करत असतो पण आता त्यांनी केलेल्या शौर्याला सुद्धा आपण दाद द्यायला हवी जेणेकरून खूप सारे जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल. हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

तीन योद्धांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले कि, समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पडण्याची हीच खरी वेळ होती. तसेच सीमेवर सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून नेहमीच लढत असतात मग आपण देशावर, समाजावर आलेल्या संकटाला दूर करण्यासाठी एकदा पुढे यायला काय हरकत आहे.

पत्रकार परिषदेला चार मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. पत्रकार परिषदे मागची उद्दिष्टे आणि अनुभव युवा प्रशिक्षण केंद्राची उद्दिष्टे व्यक्त करताना डॉ. लीडविन डायस, प्राचार्य, कॉलेज ऑफ सोशल वर्क यांनी युवांनी केलेल्या कार्याला प्रोस्ताहित केले. तसेच झोन ४ सोल्युशन्सला त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद सुद्धा केले.

तसेच राजेंद्र सिंह, सदस्य, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), नवी दिल्ली, संतोष कुमार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (एनआयडीएम), नवी दिल्ली, कर्नल व्ही. एन. सुन्नेकर, यशदाचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र संचालक आणि नकुल तरुण कुमार, झोन ४ सोल्युशन्स प्रा. लि. यांनी सामाज विकासाठी युवकांचा सहभाग मिळवण्यासाठी युवांना प्रोस्ताहन केल्याबद्दल कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन, अनुभव युवा प्रशिक्षण केंद्राचे आणि झोन ४ सोल्युशन्सचे अभिनंदन केले आणि पुढे जाऊन एकत्रित काम करण्याचे आव्हाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here