माघी गणेशोत्सवानिमित्त भाविकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश

मुंबई – (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) गुरुवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी माघी गणेशोत्सव निमित्त मस्जिद बंदर येथील खेतवाडी गोलदेऊळ येथे कुंभारवाडा २ आणि ३ याठिकाच्या गणेश मंडळात व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.

 

कुंभारवाडा नागरिक समिती ओमकार मित्र मंडळाचे शाखा प्रमुख वैभव मयेकर यांनी स्वतः गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना व्यसनमुक्तीचे पत्रक वाटप केले. तर दुसरा कुंभारवाडा येथील सार्वजनिक (माघी) गणेशोत्सव मंडळ येथे व्यसनमुक्तीची विचार पुस्तिका आणि शपथ पत्रक हे गणपती बाप्पाच्या चरण दर्शनाच्या वेळी लोकांच्या नजरेस पडून नशामुक्तीचा संकल्प घ्यावा म्हणून गणेशाच्या चरणी ठेवण्यात आली होती.

mumbai1

महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ, मुंबई. मुंबईचे जिल्हा संघटक प्रियांका सवाखंडे आणि सुनिल चव्हाण यांनी हा उपक्रम घेण्यास गणेश मंडळास सहकार्य केले.

mumbai,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here