पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली एम्स्‌ रुग्णालयात घेतली कोरोनाची लस

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना लस टोचून घेतली. मोदींनी स्वतः याची माहिती देत सांगितले की, ‘कोरोनाविरुद्ध या वैश्विक लढाईत आपल्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी सर्वोत्तम काम केले आहे.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला कोरोनामुक्त करूयात’. न्यूज एजन्सीनुसार पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकची कॅव्हॅक्सिन लस घेतली आहे. पद्दुचेरीची नर्स पी निवेदा यांनी मोदींना लस दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here