10 लाख हेल्थ वर्कर्स दुसरा डोस घेण्यास आलेच नाहीत
नवी दिल्ली – आजपासून १० हजार सरकारी आणि ११ हजार खासगी केंद्रांवर लसीकरण सुरू होईल. पण चिंतेची बाब म्हणजे ९.८४ लाख हेल्थ वर्कर्स आतापर्यंत लसीचा दुसरा डोस घेण्यास आले नाहीत. दुसरा डोस १३ फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. २६ फेब्रुवारीपर्यंत १४ दिवसांत २५.१६ लाख जणांनी दुसरा डोस घेतला. एवढ्याच दिवसांत ३५ लाख लोकांनी पहिला डोस घेतला होता.
याबाबत बोलताना आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले की, दुसरा डोस घेतला नाही तर पहिला डोस वाया जाईल, संसर्गाचाही धोका ज्याने पहिला डोस घेतला आहे, पण दुसरा डोस घेतला नाही, तर हा केवढा मोठा धोका आहे? दुसरा डोस घेतल्यावरही १२-१५ दिवसांपर्यंत संसर्गाचा धोका कायम राहतो. कारण, पूर्ण रोग प्रतिकारशक्ती येण्यास ४० पेक्षा जास्त दिवस लागतात. त्यामुळे दुसरा डोस घेण्यास विलंब केला तर संसर्गाचा धोका कायम राहतो. त्यामुळे पहिला डोसही वाया जाईल.






