नवी दिल्ली – काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष पवन बन्सल यांच्यानंतर आता गांधी परिवाराचे जावई राॅबर्ट वाड्रा यांनीदेखील राम मंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिला. त्यांनी जयपुर येथील मोतीडुंगरी गणेश मंदिरात दर्शन घेतले.
या वेळी राम मंदिराशी निगडित प्रश्नावर ते म्हणाले, मी समानतेवर विश्वास ठेवतो. जर मी याआधी कधी चर्च, मशीद वा गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर राम मंदिरासाठीही देईन. या वेळी वाड्रा यांनी दुसऱ्यांदा राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली.
ते म्हणाले, मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारणी कुटुंबाशी जोडला गेलो आहे. राजकारणात एखाद्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करावे अशी लोकांची इच्छा आहे. आता देशभरात आध्यात्मिक दौरे करत आहे. जेव्हा माझी वेळ येईल, त्या वेळी राजकारणात प्रवेश करेन.






