इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला
चैन्नई (आंध्रप्रदेश) – रविवारी भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानच्या माध्यमातून 19 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले. नवीन वर्षांतील हे पहिले ऐतिहासिक मिशन इस्रोने फत्ते केले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँच पॅडकरून सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी भारतीय रॉकेट पीएसएलव्ही-सी 51 रवाना करण्यात आले.
19 उपग्रहांपैकी 13 उपग्रह अमेरिकेचे आहेत. याशिवाय ब्राझिलच्या 637 किलो वजन असलेल्या ‘अमेजोनिया’ उपग्रहाचे लाँचिंग करण्यात आले. भारताने ब्राझीलचा उपग्रह लाँच करण्याची पहिली वेळ आहे. या लाँचिंगमुळे भारतानेने आतापर्यंत अंतराळात पाठवलेल्या विदेशी उपग्रहांची एकूण संख्या 342 झाली आहे.
चेन्नईतील सतीश धवन सॅटेलाईट स्पेस किड्स इंडियाने तयार केलेल्या उपग्रहाच्या टॉप पॅनेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र कोरण्यात आले आहे. त्याशिवाय एका एसडी कार्डमधून ई-भगवद्गीताही अंतराळात पाठवण्यात आली.






