कोरोना लस घेण्यास काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेंचा नकार, सांगितलं कारण..

नवी दिल्ली – देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याची मोहीम आजपासून सुरू झाली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र लस घेण्यास नकार दिला आहे. ‘कोरोना लस कधी घेणार?’ या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी याचं कारण सांगितलं.

मल्लिकार्जुन खर्गेंनी ज्येष्ठ नागरिकांच्या ऐवजी तरुणांना आधी लस देण्याची मागणी केली आहे. ‘माझं वय आता 70 वर्ष आहे. कोरोना लस तरुणांना द्यायला हवी. त्यांच्याकडं मोठं आयुष्य आहे. माझ्याकडे तर आता 10 ते 15 वर्षच आयुष्य उरलंय.’ असं स्पष्टीकरण खर्गे यांनी दिलं आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील कोरोनाची लस टोचून घेतली. “बिहारमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मोफस दिली जाईल. सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा कोरोना लसीकरणाची सुविधा बिहार राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देणार असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here