शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून आपली तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. तसेच गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोविड टेस्ट करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

खा. शिंदे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here