शॉर्ट ड्रेसने केली रकुल प्रीत सिंगची अशी फजिती

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. लवकरच अभिनेत्री महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रकुल या सिनेमाबद्दल खूप उत्सुक आहे, हे तिनं याआधीच सोशल मीडियावर सांगितलं आहे. हा सिनेमा आहे मेडे.

या व्यतिरिक्त रकुल आपल्या फॅशन सेन्समुळंही भरपूर चर्चेत असते. तिने आपल्या सोशल अकाऊंटवर केलेल्या फोटोंना तिचे फॅन्स पसंद करतात. सध्या तिचा समर लूक खूप चर्चेत आहे. मात्र, स्टायलिश दिसणाऱ्या या ड्रेस तिच्यासाठी मोठी अडचणही ठरला आहे.

नुकतंच तिला तिच्या समर लूक लेमन यलो कलरचा ड्रेस आणि डेनिम जॅकेटमध्ये स्पॉट केलं गेलं. तिनं आपला हा लूक पांढऱ्या रंगाच्या शूजसोबत पूर्ण केला. मात्र, फोटोग्राफर्सला पोज देण्यासाठी रकुल उभी राहाताच तिचा ड्रेस हवेनं उडू लागला. अभिनेत्रीनं आपल्या हातानं ड्रेस पकडत कसंतरी परिस्थिती सांभाळून नेली, मात्र हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here