शिवसेनेचे अनंत जोशी यांचा गटनेतेपदाचा राजीनामा
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – येथील महापालिकेचे शिवसेना गटनेते अनंत (बंटी) जोशी यांनी आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा आज शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या या राजीनाम्याने महानगरपालिकेच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान अनंत जोशी यांनी महापालिके भाजपाच्या महापौर भारतीताई सोनवणे यांचा जाहीररित्या केलेला सत्कार पक्षाचे इतर नगरसेवक व पक्षश्रेष्ठींना न रुचल्याने बंटी जोशी अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.
बंटी जोशी यांनी गेल्या अडीच वर्षापासून शिवसेना गटनेता म्हणून उत्कृष्ट काम केले होते. मात्र चुकीच्या पध्दतीने वरिष्ठांपर्यंत संदेश गेल्याने, आपण गटनेतापदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बंटी जोशी यांनी सांगितले.






