देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या अन्य नेत्यांविरुद्ध बंजारा समाजाची तक्रार दाखल

वाशिम – पूजा चव्हाण हिच्या कुटुंबाची बदनामी करून बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चित्र वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातकळकर, शांताबाई चव्हाण यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय बंजारा परिषदचे युवा जिल्हा अध्यक्ष श्याम राठोड यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. आमच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत तपास सुरू असल्याचे मानोरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानकर यांनी सांगितले.

पुजा चव्हाण या मुलीने आत्महत्या केली असून त्याचे आम्हालाही दुखं आहे. याप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, परंतु भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चित्र वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातकळकर तसेच पुजाची आजी असल्याचा दावा करणाऱ्या शांताबाई राठोड हे लोक पूजा चव्हाण हीच्या कुटुंबियांची तसेच बंजारा समाजाची बदनामी करत आहेत. तसेच तपासात अडथडा आणत असल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपनेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा बंजारा समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here