नवी दिल्ली – इंटरनेटवर अनेक पाळीव तसेच वन्य प्राण्यांचे व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. अशाच एका गाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
विदेशातील एक गाय रस्त्यावर एका मॉडेल प्रमाणे कॅटवॉक करत आहे आणि नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते अद्याप अस्पष्टच असून, 2018 पासून सोशल मीडियावर हा व्हिडिओ आहे. नुकत्याच एका ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर करण्यात आला आहे. तसेच ही गाय अशी का चालते? तिला काही हाडाची समस्या आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्याच्या मध्यभागी चालणाऱ्या या गायीचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. तसेच आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हे सर्व पाहनं मजेशीर असले तरी तिला काही दुखापत झाली आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी या व्हिडिओ वर कंमेंट करत विचारला आहे. याआधीही असे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या चालीने सर्वांचे मन मोहून टाकणाऱ्या या गाईचा हा व्हिडिओ नक्की बघा.
पाहा व्हिडीओ –
ทำไมเราต้องมานั่งขำอะไรแบบนี้ด้วยเนี่ย 5555555555555555 pic.twitter.com/peMruwBSm4
— ᴮᴱ𝕪𝕠𝕟𝕕 ₇ (@emesspace) February 22, 2021






