नाशिक (विशेष प्रतिनिधी) – उजणी शिवारात (दि.०१) मध्यरात्री ११ वा.सुमारास शोभा देवराम हजारे व सुर्यभान शंकर सापनर यांच्या शेतातील तोडणीला आलेला ऊस आगीत जळून भस्मसात झाला आहे.
स्थानिक शेतकरी वाघ हे आपल्या उसाला पाणी देत असताना त्यांच्या निदर्शनास हि गोष्ट आली. घटनेची माहिती त्यांनी सापनर कुटुंबियांना दिली. त्यांनी तात्काळ इतर शेतकऱ्यांना मदतीला घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीत ६० गुंठ्यापैकी ३० गुंठे ऊस पुर्णपणे आगीत जळाला. यात जवळपास शेतकऱ्याचे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आहे.
दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार हि आग कोणीतरी लावली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकारासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचे हि त्यांनी सांगितले.






