भाजपचा मंत्री अडकला ‘सेक्स सीडी स्कॅंडल’मध्ये

कर्नाटक – येथील भाजपाचे मंत्री रमेश जारकीहोली यांच्यावर एका तरुणीने जॉब देण्याच्या आश्वासनावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर मंत्र्यांचे व तरुणीचे इंटिमेट व्हिडीओ देखील न्यूज चॅनेलवर दाखविण्यात आले. पीडित तरुणीनेच त्यांच्यातील खासगी क्षणांची सीडी न्यूज चॅनेलला दिल्याचे समजते.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी बंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेत या प्रकरणी तातडीने तपास करण्याची मागमी केली आहे. ‘पीडित महिलेला तिची ओळख जाहीर करायची नाही. त्यामुळे तिने मला तिच्या वतीने पोलिसांत तक्रार द्यायला सांगितले आहे. मंत्री जारकीहोली यांनी नोकरी देण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीला एक लघु चित्रपट बनवायचा होता. तिने तसे मंत्र्यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी किला कर्नाटक पॉवर ट्रान्समिसन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीचे आश्वासन देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र जेव्हा त्यांच्यातील त्या क्षणांचे काही व्हिडीओ तरुणीकडे असल्याचे मंत्र्यांना कळाले तेव्हा त्यांनी तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली’, असे कल्लाहाली यांनी सांगितले.

‘पीडितेने मला मंत्र्यांचे व तिचे व्हिडीओ असलेली सीडी दिली आहे. मंत्र्यांविरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून मत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करावा व तरुणीला पोलीस सुरक्षा द्यावी’, अशी मागमी कल्लाहाली यांनी केली आहे.

गेल्या वर्षी काँग्रेस व जेडीएसच्या 17 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या 17 आमदारांपैकी एक जारकीहोली होते. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील आणखी एका भाजप मंत्र्याचा भाजप कार्यकर्त्यासोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here