जॉन अब्राहमचा सेटवरील न्यूड फोटो व्हायरल; २ तासात ४ लाख लाईक

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडमधील हॉट अभिनेता जॉन अब्राहमने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच या फोटोचा चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. या फोटोमध्ये जॉन अब्राहम मसल्सवर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटावर काम सुरू केले आहे. जॉनने चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये जॉन पूर्णपणे नग्न बसलेला दिसत आहे. तो शूटच्या आधी कपडे येण्याची वाट पहात आहे. हा सेटवरील फोटो काही सामान्य फोटो नाही. या फोटोत जॉन अब्राहम केवळ एका उशीने स्वत: ला झाकण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे.

जॉन सोफ्यावर बसलेल्या अवस्थेत कॅमेर्‍याकडे पाहून हसत आहे आणि त्याच्या मांडीवर पांढरी उशी आहे. हे चित्र समाविष्ट करताना जॉन अब्राहमने लिहिले, “मी कपडे येण्याची प्रतीक्षा करीत आहे. #setlife ” चाहत्यानींही हा फोटो पाहून कॉमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जॉनच्या या फोटोवर फॅन्सनी अवघ्या २ तासात ४ लाखाहून जास्त लाईक व हा फोटो शेअर केला आहे.

जॉन नेहमीच आपल्या मसल्सचे, त्याच्या बॉडीचे फोटो शेअर करत असतो. मात्र जॉनने शेअर केलेला हा न्यूड फोटो नेटकऱ्यांच्या आर्कषणाचा विषय बनला आहे. जॉन आपल्या फिटनेसबाबत खूपच सिरीयस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here