मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – दरवर्षी होणाऱ्या एमबीबीएस परीक्षा यंदा ऑनलाईन होणार नाहीत तर ऑफलाईन होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सगळ्याच परीक्षा ऑन लाईन होतील अशी परिस्थिती आहे. मात्र एमबीबीएस परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षा ८ मार्चपासून सुरु होत आहे. परीक्षा ऑनलाईन व्हावी यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना अनेक पत्र पाठवण्यात आले होते, मात्र तरीही परीक्षा ऑफलाईनचं होणार आहेत.






