अभिनव आंदोलनाने केला मोदी सरकारचा जाहीर निषेध
जळगांव (संपादक सुनिल पाटील) – केंद्र सरकार गॅस सिलेंडरच्या आणि इंधन दरात सातत्याने वाढ करत आहे. “फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 3 वेळा गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये वाढ झाली ही अनुक्रमे 25, 50, 25 इतकी वाढवली गेली.
मार्च महिन्यात पहिल्याच दिवशी 25 रुपये वाढ केली.गॅस सिलेंडरचा आजचा भाव 827 रुपये असुन स्वातंत्र्यानंतर च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ केली. यामुळे सर्वसामान्य जनता, गृहिणी त्रस्त झाले आहेत त्यांचे जगणे असह्य झाले असुन बजेट बिघड़ले आहे. तरी मोदीजी महागाई चा मुद्यांवर ना बघत आहेत, *ना बोलत आहेत ,ना ऐकत आहेत जनतेच्या अपेक्षा पूर्ण न करणारे मोदी सरकार असुन , ईंधन दरवाढ, महागाई यामुळे मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.
ह्या दर वाढच्या निषेधार्थ आज रिलायन्स पेट्रोल पंप वर “मैं ना देखुगा, मैं ना बोलुगा, मैं ना सूनुगा” आंदोलन करण्यात आले प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस मुक्तदिर बाबा देशमुख व शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष मुजीब पटेल यांचा नेतृत्व मध्ये आंदोलन करण्यात आले त्यावेळी रईस कुरेशी, नाझिम शेख, बापू मोरे ,विनोद पाटील व युवक काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते






